S M L

नॅनो आली दिमाखात

24 मार्च लाखोंच्या स्वप्नातली ' पीपल्स कार ' नॅनोचं सोमवारी मुंबईतल्या पारसी जिमखान्यात एका शानदार समारंभात दिमाखात उद्घाटन झालं. ' माझं वचन मी पाळलं आणि त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. नॅनोची निर्मिती ही माझा अहं जोपासण्यासाठी केली नाही किंवा लाख रुपये किंमतीचा खेळ करण्यासाठी केली नाही. सर्वसामान्यांचं कार बाळगण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी केली, अशी भावना नॅनोच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकार परिषदेत ' टाटा सन्स ' आणि ' टाटा मोटर्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत रतन टाटा यांना ' नॅनो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला फार उशीर होईल असं वाटत नाही का, असं विचारलं असता त्याप्रश्नाचं उत्तर त्यांनी खूपच गमतीशीर दिलं. ते म्हणाले, '' पॅरिसच्या ऑटो शोमध्ये माझा एक मित्र म्हणाला, नॅनो ही एका सुंदर युवतीप्रमाणे आहे. ती सुंदर आणि तरुण असतानाच तिला भेटण्यात गंमत आहे. अन्यथा काळाबरोबर तीही जाडी, कुरूप आणि अनाकर्षक बनेल ! "सध्या ' टाटा मोटर्स'च्या पंतनगर इथल्या प्लांटमध्ये ' नॅनो ' बनत आहे. तिथे फक्त वर्षाला 50 हजार नॅनो बनतील. गुजरातमधल्या साणंद इथे खास नॅनोसाठी उभारलेल्या प्लांटमध्ये वर्षाला 2 लाख 50 हजार ' नॅनो ' बनतील. तो वर्षाअखेरीपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे पुढल्यावर्षीपासून नॅनो मिळणं अधिक सुलभ होईल, अशी ग्वाहीही रतन टाटांनी दिली. नॅनो कार ही तीन प्रकारात मिळणार असून त्यासाठी नोंदणी 9 ते 25 एप्रिल या काळात चालेल. नॅनोच्या बुकिंग फॉर्मची किंमत 300 रुपये आहे. नोंदणी फॉर्म्ससाठी ' टाटा ' ग्रुपमधल्या इतर कंपन्यांचाही वापर करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर 15 बँकांच्या माध्यमातून ' नॅनो 'च्या नोंदणीची प्रोसेस होणार आहे. नॅनो ही पेट्रोलवर चालणारी असून एक लिटरमध्ये 20 किलोमीटर मायलेज देऊ शकते. नॅनोचं येत्या एक-दोन वर्षात डिझेल व्हर्जनही येणार आहे. लाखमोलाच्या नॅनोची तुलना आता मोठ्या गाड्यांशी होऊ लागलीय. कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही पण लक्झरी गाडी पोर्शे आणि फेरारीशी नॅनोची तुलना होतेय. याचं कारण आहे नॅनोची टेक्नोलॉजी. इतर लक्झरी गाड्यांइतकीच नॅनोची टेक्नोलॉजी सरस आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2009 05:41 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2009 05:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close