S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर : 4 जागांवरचे उमेदवार अनिश्चित

24 मार्च, मुंबईआशिष जाधव आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 जागांवर लढवणार आहेत, असं सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी दिल्लीत स्पष्ट केलं. त्यावेळी त्यांनी उभय पक्षात यानंतरही एक किंवा दोन मतदार संघाची अदलाबदली होऊ शकते, असंही ते म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसेने 22 पैकी 18 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. पण 4 जागांवरील उमेदवारांची नावं केवळ अंतर्गत मतभेदांमुळे जाहीर करता आली नाहीयेत. परिणामी आघाडीचा घोळ संपल्यावरही पक्षांतर्गत रुसवे काढण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं 4 जागांच्या उमेदवारांबाबत मत अजून कायम होत आहे. उस्मानावादच्या जागेचा काँग्रेसचा आग्रह अजूनही कायम आहे. त्यामुळे पद्मसिंह पाटीलांची उमेदवारी राष्ट्रवादीने अडवून धरली आहे. जालन्याच्या बदल्यात उस्मनाबाद काँग्रेसला द्यावी असं काही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना वाटतं. आमदारकीचा राजीनामा दिलेले काँग्रेसचे नाना पटोले भंडार्‍याहून बंडखोरीचा झेंडा उगारण्याची शक्यता आहे. त्यामुळं वर्षा पटेलांऐवजी खुद्द प्रफुल्ल पटेल किंवा नाना पंचबुद्धे यांना भंडार्‍यातून उभं करावं अशी जोरदार मागणी पुढे आलीय. मावळ मधून आझम पानसरेच्या रूपात मुस्लीम उमेदवार द्यायचं ठरवण्यात आलं होतं, पण कॉंग्रेसचे पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या उमेदवारीवर ऐनवेळी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसतायत. माळी समाजाबरोबरच तेली समाजालाही प्रतिनिधित्व देऊन खुश करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळंच रावेरमधून रवीन्द्र पाटीलांऐवजी तेली समाजाच्या संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जातेय. आघाडीतलं जागावाटप राष्ट्रवादी (22 जागा )जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा गोंदिया, हिंगोली, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, मावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले.राष्ट्रवादीचे उमेदवार जळगाव - वसंत मोरे बुलढाणा - राजेंद्र शिंगणे अमरावती - राजेंद्र गवई - रिपाइंहिंगोली - सूर्यकांता पाटीलपरभणी - सुरेश वरपूडकरदिंडोरी - नरहरी झिरवळ नाशिक - समीर भुजबळ ईशान्य मुंबई - संजय दिना पाटीलकल्याण - वसंत डावखरे ठाणे - संजीव नाईकशिरुर - विलास लांडे बीड - रमेश आडस्करमाढा - शरद पवारबारामती - सुप्रिया सुळेसातारा - उदयनराजे भोसलेकोल्हापूर - संभाजीराजे भोसलेहातकणंगले - निवेदिता मानेअहमदनगर - शिवाजी कर्डिलेकाँग्रसे (26 जागा ) : नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली - चिमूर, अकोला, चंद्रपूर, वाशिम -यवतमाळ, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, पुणे, सोलापूर, सांगली, धुळे, रामटेक, नंदूरबार, शिर्डी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, भिवंडी, पालघर, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई आतापर्यंतचे काँग्रेसचे उमेदवारनंदुरबार - माणिकराव गावित धुळे - अमरीश पटेलअकोला - बाबासाहेब धाबेकरवर्धा - दत्ता मेघे रामटेक - मुकूल वासनिक नागपूर - विलास मुत्तेमवार गडचिरोली-चिमूर - मारूतराव कोवासेयवतमाळ-वाशिम - हरिभाऊ राठोड नांदेड - भास्कर पाटील -खतगावकर पुणे - सुरेश कलमाडीचंद्रपूर - नरेश पुगलियारायगड - ए. आर. अंतुलेरत्नागिरी-सिंधुदुर्ग - निलेश राणेउत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्तदक्षिण मध्य - एकनाथ गायकवाडदक्षिण मुंबई - मिलिंद देवराभिवंडी - सुरेश टावरे

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2009 07:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2009 07:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close