S M L

काँग्रेसचा जाहीरनामा : आम आदमीसाठी असल्याचा दावा

24 मार्च, नवी दिल्ली दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना तीन रुपये किलो दरानं 25 किलो तांदूळ देण्याची घोषणा काँग्रेसनं केलीय. काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा घोषित केला. त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेत दिवसाला शंभर रुपये मजुरी, सर्व गावांना ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात आहेत. वाढती महागाई हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि महागाई रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय. प्रत्येक नागरिकाला जास्तीत जास्त सुरक्षा पुरवण्यात येईल असं काँग्रेसचं आश्वासन आहे. सुरक्षा दलं दक्ष राहतील याची काळजी घेऊ तसंच सुरक्षा दलातील जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणाची काळजी घेऊ असं काँग्रेस म्हणतंय. पोलीस रिफॉर्म्स, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आणणं, पस्तिशी खालील बेरोजगारांसाठी स्कील डेवलपमेंट प्रोग्रॅम आणला जाईल. त्यासाठी 30 हजार कोटी खर्च केले जातील असं आश्वासन काँग्रेसनं जाहीर नाम्यात दिलंय. मागास समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी कोचिंग फी दिली जाईल. दरवर्षी अनुसुचित जाती आणि जमातीच्या एक लाख विद्यार्थ्यांना ती दिली जाईल असं काँग्रेसचं आश्वासन आहे. वॅट, एक्साईज टॅक्स, सर्विस टॅक्स, एन्टरटेनमेंट टॅक्स असे वेगवेगळे टॅक्स रद्द करणार, त्याऐवजी एकत्रित गुडस ऍन्ड ट्रान्सपोर्ट टॅक्स लागू करणार अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2009 10:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2009 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close