S M L

निवडणुक प्रचारासाठी मैदाने जंग : मनसेनं मारली बाजी

26 मार्च पंधराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष आता जय्यत तयारीला लागलेत. प्रचारासाठी मोठी मैदानं ऍडव्हान्समध्ये बुक करण्याची चढाओढही सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधीही काही पक्षांनी सोडलेली नाही. या राजकारणाच्या पाश्‍र्वभूमीवर मनसेनं मात्र मैदानजिंकलं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा सर्वांत मोठा आखाडा म्हणजे मुंबईतलं शिवाजी पार्क. याच शिवाजी पार्कवर आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांच्या विक्रमी सभा झाल्या आहेत. निवडणूक कोणतीही असो प्रत्येक पक्षाला मुख्य प्रचार सभा शिवाजी पार्कवरच घ्यायची असते. तसंच प्रत्येक निवडणुकीत शिवाजी पार्कवरची शेवटची मुख्य सभा, शिवसेनेचीच होते. पण यावेळी शिवसेनेला ही संधी हुकली आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा 26 एप्रिलला होणार असल्याचं शिवसेनेचे नेते मनोहर जोशी म्हणाले.सत्ताधारी पक्ष मात्र जागावाटपाच्या भांडणात शिवाजी पार्क बुक करायला विसरले असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2009 02:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2009 02:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close