S M L

दुस-या टेस्टमध्ये न्यूझीलंडचं वर्चस्व : 619 धावांचं लक्ष्य

27 मार्च नेपिअर टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या नऊ विकेटवर 619 रन्सच्या विशाल स्कोअरला उत्तर देताना भारतीय टीमला सुरुवातीलाच तीन धक्के बसलेत. सेहवागने भारतीय इनिंगची सुरुवात तर आक्रमक केली शिवाय व्हिटोरीला त्याने जोरदार सिक्सही लगावला. पण पुढच्याच बॉलवर खराब शॉट खेळून सेहवाग आऊट झाला. त्याने 39 बॉल्समध्ये 34 रन्स केले. गौतम गंभीरही खराब शॉट खेळून तंबूत परतला. जितेन पटेलला त्याने आपली विकेट बहाल केली. नाईट वॉचमन म्हणून आलेला ईशांत शर्मावर डकवर आऊट झाला. उरलेल्या ओव्हर्स मग राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी सावधपणे खेळून काढल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताचे दोन विकेटवर 79 रन्स झाले होते. द्रविड 21 रन्सवर नॉटआऊट आहे. त्यापूर्वी न्यूझीलंड टीमनं 619 रन्स केले ते जेसी रायडरची डबल सेंच्युरी आणि ब्रँडन मॅक्युलमच्या फटकेबाज सेंच्युरीच्या जोरावर. कॅप्टन व्हिटोरीने हाफ सेंच्युरी ठोकली. भारतातर्फे झहीर आणि ईशांत यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 27, 2009 07:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2009 07:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close