S M L

शाह-आझम यांच्याविरोधात FIR दाखल करा : आयोग

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2014 10:17 PM IST

शाह-आझम यांच्याविरोधात FIR दाखल करा : आयोग

amit shah azham11 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना प्रक्षोभक भाषण भोवलंय. निवडणूक आयोगाने त्यांच्या जाहीर सभा आणि रोड शोवर बंदी घातलीय. आणि त्यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

अमित शाह आणि  यांनी जाणूनबुजून वक्तव्यं केली होती. आणि त्यामुळे आचारसंहिता तसंच कायद्याचा भंग झालाय, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमध्ये बोलताना अमित शाहनी बदल्यालसाठी मत द्या, असं आवाहन मतदारांना केलं होतं. तर कारगीलमध्ये फक्त मुस्लीम जवान शहीद झाले होते, हिंदू नाही, असं आझम खाननी म्हटलं होतं.

===============================================================

» बदला घेण्यासाठी मत द्या -अमित शाह

आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे लाठी काठ्या-गोळ्यांची ही वेळ नसून आता निवडणुकीत बदला घेण्याची ही संधी आलीय, मोगलाच्या जमान्यात तलवारीने बदला घेतला जायचा पण आता बटन दाबून बदला पूर्ण करायचाय त्यांनंतर त्यांची जागा दाखवू असं वादग्रस्त व्यक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशाचे प्रभारी अमित शाह यांनी केलं. दंगलग्रस्त मुझफ्फरनगरमध्ये एका सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. अमित शाह हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवारी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहे.

===============================================================

» ‘कारगिल’मध्ये हिंदू नव्हे, फक्त मुस्लीम जवानच शहीद -आझम खान

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी म्हटलंय की, “कारगिल युद्धात फक्त मुस्लिम जवान शहीद झाले होते आणि एकही हिंदू सैनिकाने प्राण दिले नव्हते.” भाजपने आझम खान यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात लक्ष घालू आणि चौकशी करू, असं निवडणूक आयोगने म्हटलं .  आझम खान यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलंय. मुस्लिम जवानांना त्यांचं श्रेय मिळायलाच हवं, असं त्यांनी पुन्हा म्हटलं.

===============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2014 09:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close