S M L

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2014 06:18 PM IST

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

gulzar_dadasaheb12 एप्रिल : प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांना आज (शनिवारी) मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय. भारतीय चित्रपट सृष्टीतला हा सर्वोच्च सन्मान आहे.

 

1963 सालापासून संपूरण सिंग कालरा अर्थात गुलजार हे गीतलेखन करतायेत. त्यानंतर 1971 साली त्यांनी 'मेरे अपने' हा चित्रपट बनवून दिग्दर्शनात पदार्पण केलं. आपल्या चित्रपटांचं त्यांनी पटकथा आणि संवादलेखनही केलं. आंधी, चुपचुपके, अचानक, कोशिश, मौसम, माचिस असे अजरामर चित्रपट त्यांनी बनवले.

 

80 वय हेत आलं तरी तरुण संगीतकारांबरोबर ते अगदी सहजतेने काम करतात. गुलजार यांच्या लघुकथाही फार प्रसिद्ध आहेत. 'धुआँ' या कथासंग्रहासाठी त्यांना 2002 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गुलजार यांचे 'रात पशमीने की', 'पुखराज', 'निगलेक्टेड पोएम' आणि 'सलेक्टेड पोएम' हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2014 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close