S M L

कॉम्रेड शरद पाटील यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Apr 13, 2014 03:55 PM IST

कॉम्रेड शरद पाटील यांचं निधन

comrade sharad pati;13 एप्रिल :  सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद पाटील यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्यावर धुळ्यात आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धुळ्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट चळवळीचा खंदा समर्थक हरपला आहे. कॉम्रेड पाटील हे विचारवंत, जातीव्यवस्थेचे अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. शरद पाटील यांनी आदिवासी शेतमजूर, यांच्यासाठी लढे उभारले. १९४५ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथील शिक्षण अर्धवट सोडून ते कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाले. इंग्रजी आणि मराठी भाषेत त्यांनी विपुल लेखन देखील केले. दासशूद्रांची गुलामगिरी, चार्वाक दर्शन ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2014 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close