S M L

बैतुल्लाह मेहसूदने स्वीकारली लाहोर हल्ल्याची जबाबदारी

31 मार्च, इस्लामाबादबैतुल्लाह मेहसदनं काल सोमवारी लाहोरच्या मानावन पोलीस ट्रेनिंग कॅम्पमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तेहरिक-ए-तालिबानचा कमांडर असणार्‍या बैतुल्लाह मेहसदचा बेनझिर भूत्तो यांच्या हत्त्येच्या कटात सहभाग होता. हल्ल्यात सापडलेला एक अतिरेकी हिजरतुल्ला याला उर्दू येत नसल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हंटलंय. तसंच हे सर्व अतिरेकी अफगाणिस्तानातून आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. आता हिजरतुल्लाच्या चौकशीतून अनेक गोष्टींची माहिती मिळू शकेल. लाहोरमध्ये काल पोलीस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्यात 27 पोलीस तर 4 अतिरेकी ठार झाले होते. इतर तीन अतिरेक्यांना जिवंत पकडण्यात आलं. तर 2 अतिरेकी फरार झाल्याचंही समजतंय.लाहोरमधल्या मानावन पोलीस सेंटरमधल्या परेड ग्राऊंडवर सकाळी साडेसात वाजता अतिरेक्यांनी हल्ला केला होता. प्रत्यक्षदशीर्ंच्या सांगण्यानुसार 15 ते 20 अतिरेकी होते. त्यापैकी काहीजण पोलीस युनिफॉर्ममध्ये होते. ते सर्वजण शस्त्रसज्ज होते. अतिरेक्यांनी वेगवेगळ्या दिशांनी परेड ग्राऊंडवर हल्ला चढवला. काही मिनिटांतच जवळपास 800 पोलिसांना अतिरेक्यांनी ओलीस धरलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऍकॅडमी सील केली. खास प्रशिक्षण घेतलेले निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले. पण अतिरेक्यांविरोधातली कारवाई धीमी होती. त्याचा फायदा घेत अतिरेक्यांनी ऍकॅडमीतल्या अनेक इमारतींमध्ये पोझिशन घेतली. त्यांनी खिडक्यांमधून गोळीबार सुरू केला. दिवसभर अतिरेकी आणि जवान यांच्यात धुमश्चक्री सुरू होती. दोन अतिरेक्यांचा स्वतःच घडवलेल्या स्फोटात मृत्यू झाला. तर लष्कराच्या कारवाईत इतर दोघे ठार झाले. तिघांना जिवंत पकडण्यात यश आलं. या कारवाईत 27 पोलीस आणि चार अतिरेकी ठार झालेत. जवळपास 90 जण जखमी झालेत. पोलीस ऍकॅडमीचा आता पुन्हा सरकारनं ताबा घेतलाय. पण अतिरेक्यांनी लाहोर पोलिसांनी दिलेला हा धक्का मोठा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2009 08:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2009 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close