S M L

लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूड

31 मार्च, मुंबई लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी बॉलिवूडमधल्या दोन टॉपच्या कलाकारांनी रॅम्पवर उतरून फॅशन वीकला चार चांद लावले. एकीकडे शाहरूख खानने त्याच्या टीमचं म्हणजेच नाईट रायडरचं प्रमोशन केलं तर दुसरीकडे अक्षय कुमार प्रमोशनच्या जोशात थेट प्रेक्षकांमध्येच घुसला.बॉलिवुड किंग शाहरूख खान त्याच्यावर झालेल्या सर्जरीनंतर मीडियासमोर फारसा येणार नाही अशी चर्चा असतानाच तो आपल्या कोलकाता नाईट रायडर्स च्या प्रमोशनसाठी डिझायनर स्लींगसह आणि बॉलिवुडच्या नामांकीत डिझायनर मनिष मल्होत्रानं खास बनवलेल्या कपड्यांमध्ये दिमाखात रॅम्पवर उतरला. बॉलिवुड खिलाडी अक्षय कुमारही रॅम्पवर त्याचा जलवा दाखवण्यात जराही मागे हटला नाही. त्याच्या unbuttoned जिन्सचं प्रोमोशन करताना त्याला प्रेक्षकांमधून झकास साथ दिली ती ट्विंकल खन्नानं. म्हणजे नेहमी प्रमाणे स्टन्ट्स न करता तो प्रेक्षकांना रोमॅन्स करताना दिसला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 31, 2009 11:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2009 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close