S M L

द. कोरियात प्रवाश्यांची फेरीबोट उलटली; एकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2014 03:50 PM IST

द. कोरियात प्रवाश्यांची फेरीबोट उलटली; एकाचा मृत्यू

south korea ferry sinks16 एप्रिल :  दक्षिण कोरियाच्या दक्षिण किनाऱ्यावर आज (बुधवार) सकाळी फेरीबोट उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या फेरीबोटमधून सुमारे 470 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये बरेचसे प्रवासी विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियातल्या जेजू बेटाजवळ हा अपघात झाला असून, काल रात्रीपासून दाट धुके पसरल्यामुळे, हा अपघात झाला आहे. या बोटीची एक बाजू पाण्यात बुडाली असून, ती तिरकी झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच हेलिकॉप्टर, छोट्या-मोठ्या बोटींच्या मदतीने बोटीतील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यात आत्तापर्यंत एका प्रवाशाला समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर उर्वरित प्रवाशांचा वाचवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close