S M L

'वेस्टर्न कोल फिल्ड'मध्ये कोट्यावधीचा कोळसा घोटाळा !

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2014 05:51 PM IST

Image img_215862_maharashtracoalscam_240x180.jpg16 एप्रिल : वेस्टर्न कोल फिल्डचा कोट्यावधी रुपयांचा कोळसा काळ्या बाजारात चढ्या दरानं विकण्याचा घोटाळा उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य कंझ्युमर को. ऑपरेटीव्ह फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांविरोधात दुर्गापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र स्टेट कन्झुमर को.ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी काही दलानांना हाताशी धरून ठिकठिकाणाहुन करोडो रुपयांच्या कोळश्याची उचल केली आणि नंतर हा कोळसा काळ्या बाजारात विकल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपुर्वीपासून हा घोटाळ्या सुरु असून कोट्यावधीच्या सरकारी महसुल बुडाला आहे.

याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूरात तीन आणि चंद्रपुरात दोन अश्या एकूण पाच ठिकाणी छापे टाकले. या घोटाळ्यात कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणातील कागदपत्रे हाती लागले आहेत. महाराष्ट्र स्टेट कन्झुमर को. ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पदाधिकार्‍यांसह अनेकांच्या या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2014 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close