S M L

जसवंत सिंग यांच्यावर निवडणूक आयोगाची कडी नजर

1 एप्रिल, मुंबई भाजपसाठी आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. भाजप नेते जसवंत सिंग यांच्या पैसे वाटण्याच्या घटनेचा अहवाल आणि व्हिडिओ निवडणूक आयोगानं मागवला आहे. राजस्थानातल्या बारमेरमध्ये आपल्या मुलाच्या प्रचार रॅलीत पैसे वाटताना जसवंत सिंगांना व्हिडिओ कॅमे-यात पकडण्यात आलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाची त्यांच्यावर कडी नजर आहे. जसवंतसिंग यांचे पुत्र मानवेंद्र सिंग बारमेरमधून निवडणूक लढवत आहेत. मानवेंद्र सिंग यांच्या प्रचार सभेतल्या दृश्यात जसवंत सिंगांना 100 रुपयांच्या नोटा वाटताना पकडण्यात आलं. दरम्यान, हा प्रकार घडला त्यावेळी आपण 200 किलोमीटर दूर प्रचारात गुंतलो होतो, असं मानवेंद्र यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. बारमेरच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. ज्यात कैलाश मेघाव ही महिलाही या पैसे वाटण्याच्या प्रकरणात दोषी असल्याचं म्हटलं आहे. पण जसवंत सिंग यांनी कैलाश मेघाव यांच्याबद्दल मौन बाळगलं आहे. मात्र आपण उमेदवार नाही आणि पैसेही वाटले नाहीत, असा दावा जसवंत सिंग यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2009 04:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2009 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close