S M L

हामिद मीर यांच्यावर प्राणघातक हल्ला

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2014 07:17 PM IST

हामिद मीर यांच्यावर प्राणघातक हल्ला

19april_hamid_mir19 एप्रिल : पाकिस्तानमध्ये गेले अनेक वर्ष सुरू असलेलं पत्रकारांवर हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. पाकिस्तानच्या जीओ टीव्हीचे सीनिअर अँकर हामिद मीर यांच्यावर कराची विमानतळाजवळ प्राणघातक हल्ला झालाय. मीर यांची प्रकृती गंभीर आहे, असं सांगण्यात येतंय.

कराची विमानतळाजवळ चार हल्लेखोरांनी मीर यांच्यावर गोळीबार केला. मीर यांना सध्या कराचीच्या एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर हल्लेखोरांनी जेव्हा पहिल्यांदा हल्ला केला, तेव्हा ते बचावले.

पण हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि पुन्हा गोळ्या झाडल्या. यात त्यांना 3 गोळ्या लागल्यात. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळतेय.या हल्ल्याची अजून कोणीही जबाबदारी घेतलेली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2014 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close