S M L

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे कालवश

2 एप्रिल, पुणेज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. सूर लावून गाणारा गायक यापेक्षाही ' एक गळ्यातून गाणारा गायक ' अशी त्यांची ओळख होती. ' गर्जा जयजयकार ', ' नवलाख तळपती दीप ', ' नका गडे पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू ', ' लाजरीच्या रोपट्याला दृष्ट नका लावू ', ' तू असतीस तर झाले असते ', ' दोन ध्रुवांवर दोघे आपण ', ' राधे तुझा सैल अंबाडा '...ही त्यांनी गायलेली गीतं खूप प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच ' अजुनि लागलेची दार ', ' आभाळीचा चांद माझ्या आज ', ' उठ राजसा घननीळा ', ' कुणी कोडे माझे उकलील का ', ' गगनी उगवला सायंतारा ', ' गाऊ त्यांना आरती ', ' या धूंद चांदण्यात तू संगती ', आणि ' यमुनाकाठी ताजमहाल'... ही गाणीही खूप प्रसिद्ध आहेत. गजानन वाटवे यांच्या जाण्यानं भावगीत युगाचा अस्त झाल्याची खंत संगीत क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2009 08:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2009 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close