S M L

कोल्हापुरकरांना दिलासा, टोलवसुलीला स्थगिती कायम

Samruddha Bhambure | Updated On: Apr 21, 2014 03:46 PM IST

TOll IRB21 एप्रिल :   कोल्हापुरात आयआरबी कंपनीकडून करण्यात येत असलेल्या टोलवसुलीला मुंबई हायकोर्टाच्यापाठोपाठ आता सुप्रीम कोर्टानेही तात्पुरती स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी मुंबई हायकोर्टाने आयआरबी कंपनीच्या टोलवसुलीला स्थगिती दिली होती. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आयआरबीने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. यावर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय आहे. तसेच रस्त्यांबाबत आढावा घेऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश टोलविरोधी कृती समितीला दिले आहेत.

 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने टोलमुक्तीची चर्चा थांबली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 21, 2014 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close