S M L

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा अखेर विवाहबद्ध

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2014 05:12 PM IST

 राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा अखेर विवाहबद्ध

31-rani-mukherjee-aditya-chopra-wedding-february22 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि फिल्ममेकर आदित्य चोप्रा अखेरीस काल रात्री इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. इटलीमध्ये हा अगदी छोटेखानी विवाहसोहळा काल रात्री झाला.

या विवाहसोहळ्यात आदित्य आणि राणीचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. यशराज फिल्मस कडून आदित्य आणि राणीच्या लग्नाला अधिकृत दुजोरा देण्यात आला. राणी आणि आदित्य गेले अनेक दिवस प्रेमबंधनात होते. या दोघांचं लग्न होणार होणार अश्या बातम्याही मिडियामध्ये रंगवल्या जात होत्या.

या वर्षी 14 फेब्रुवारीला जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये या दोघांचं ग्रँड लग्न होणार अश्या बातम्या मिडियामध्ये सुरू होत्या पण अखेरीस इटलीमध्ये काल रात्री दोघांचं लग्न झाल्याने राणी मुखर्जी फायनली राणी चोप्रा झालीय. आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असून मी माझ्या तमाम फॅन्सची आभारी आहे. मात्र लग्नबंधनात अडकताना मला यश चोप्रांची प्रकर्षाने आठवण येतेय अशी प्रतिक्रिया यावेळी राणी मुखर्जी-चोप्राने व्यक्त केली.

अगदी परीकथेसारखंच -राणी मुखर्जी

माझ्या आयुष्यातल्या सर्वात आनंदाच्या क्षणात मला माझ्या चाहत्यांना सहभागी करून घ्यायचंय. मला माहितीय की माझे हितचिंतक माझ्यासाठी खूप खुश असतील. हा सुंदर लग्नसोहळा इटलीच्या एका लहानशा गावात पार पडला. या सोहळ्याला फक्त आमचे जवळचे नातेवाईक आणि मित्र हजर होते. मला यश अंकलची खूप आठवण येत होती. पण मला माहितीय ते आमच्या बरोबर होते आणि त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आदि आणि माझ्यासोबत असतील. माझा परीकथांवर नेहमीच विश्वास होता, आणि देवाच्या कृपेनं माझं आयुष्यही अगदी परीकथेसारखंच आहे."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 11:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close