S M L

तिसर्‍या आघाडीच्या सभेला पवारांऐवजी त्रिपाठी जाणार

3 एप्रिल तिस-या आघाडीच्या आज भुवनेश्वरमध्ये होणा-या सभेत शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. या सभेत आता ते फोनवरून मतदारांशी बोलणार आहेत. पवारांचं विमान नादुरूस्त असल्यामुळे त्यांना ओरिसातल्या भुवनेश्वरच्या सभेत वेळेवर पोहोचता येणार नाहीए, असं कारण त्यांनी दिलं आहे. पण पवार विमान नादुरूस्तीचं देत असले, तरी काँग्रेसनं काल गुरुवारी दाखवलेला नाराजीचा सूर आणि वाढता विरोध पाहता, पवारांनी एक पाऊल मागे घेतलं असल्याची चर्चा सुरू आहे. कारण पवारांनी भुवनेश्वरच्या सभेत जाऊ नये, असा ' शांत ' आणि ' संयमी ' इशारा गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दिला होता. आता शरद पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डीपी त्रिपाठी तिसर्‍या आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. तर पवार येत्या 7 किंवा 8 एप्रिलला नवीन पटनाईकांच्या बीजेडीबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यात डाव्या पक्षांचे नेते उपस्थित नसतील.दरम्यान पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसंच निवडणुकांनंतर समीकरणं बदलली आणि तिसर्‍या आघाडीचं सरकार आलं तर पवार पंतप्रधान बनू शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2009 06:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2009 06:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close