S M L

ज्येष्ठ रंगकर्मी मास्टर अविनाश यांचं निधन

3 एप्रिल, सांगलीमराठी संगीत रंगभूमीवर अनेकांगी भूमिका गाजवलेले वयोवृद्ध अभिनेते मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचं आज पहाटे सांगली इथे निधन झालं. ते 101 वर्षांचे होते. रंगभूमीचा चालता बोलता इतिहास हरवल्याची खंत सिने तसंच नाट्यक्षेत्रातून व्यक्त होत आहे. वयाची शंभरी ओलांडलेल्या मास्टर अविनाश यांनी दीनानाथ मंगेशकर आणि बालगंधर्व यांच्याबरोबर काम केलं होतं. अनेक संगीत नाटकं गाजवली. ब्रह्मकुमारी, संगीत सौभद्र , मानापमान या संगीत नाटकांबरोबरच त्यांनी अनेक मराठी सिनेमातूनही काम केली.मास्टर अविनाश यांनी वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलं. आचार्य अत्रे यांनी ' पायाची दासी ' या त्यांच्या पहिल्या सिनेमात गणपतराव मोहिते यांला मास्टर अविनाश हे नाव ठेवलं आणि नंतर पुढे त्यांचं तेच नाव रूढ झालं. मा. अविनाश यांनी समाज कार्यातही आपला ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांबरोबर ते अस्पृश्यता निवारण उपक्रमातही सहभागी झाले होते. ते क्रिकेटही उत्तम खेळायचे. सी. के नायडू यांनी त्यांना बॅट भेट म्हणून देऊ केली होती. अशा या कलाकाराला गेल्याच वर्षी नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2009 09:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2009 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close