S M L

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातल्या डॉग्जनाही कुलिंग जॅकेट्सचं कवच

3 एप्रिल, मुंबईरोहिणी गोसावी मुंबईतल्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातल्या डॉग्जनाही कुलिंग जॅकेट्सचं कवच मिळालं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या कुत्र्यांना होणारा मुंबईतल्या उन्हाचा त्रास सर्वांनाच जाणवायला लागलाय. त्यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपाय शोधत असतो. मुंबईतल्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातल्या डॉग्जनाही या उन्हाचा त्रास होतोय. पण त्यांना या त्रासापासून वाचवण्यासाठी या पथकानं त्यांच्यासाठी कुलिंग जॅकेट्स आणलेत.मुंबईतल्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकात सध्या तीन डॉग्ज काम करत आहेत. लॅब्रेडोर जातीच्या या डॉग्जना जास्त ऊन आणि उष्णता सहन होत नाही. उन्हामुळे त्यांना अनेक प्रकारचा त्रास होतो. उष्णतेच्या त्रासामुळं त्यांच्या कामावरही परिणाम होेण्याची शक्यता असते. आधीच त्यांच्यावर कामाचा जास्त ताण असतो.म्हणूनच त्यांना आता कुलिंग जॅकेटस घालण्यात येतात. जेणेकरुन काम करतानाही त्यांना गारवा जाणवेल आणि कामात अडचण येणार नाही.या कुलिंग जॅकेटमध्ये एक विशिष्ट प्रकारचं जेल असतं. जॅकेट पाण्यात टाकल्यावर ते फुगतं. लॅब्रेडोरला ते घातल्यावर त्याच्या शरीरातली उष्णता शोषून घेतंच तसंच शरीराचं तापमानही मेन्टेन करतं. जसजसं या जॅकेटमधलं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं, तसतसं ते जॅकेट पुन्हा पहिल्यासारखं होतं. अशा प्रकारची ही जॅकेट्स या डॉग्जसाठी पहिल्यांदाच वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल किशोर नवार यांनी दिली. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची जबाबदारी आणखी वाढलीय. कमी मनुष्यबळ आणि कमी डॉग्जच्या संख्येमुळं त्यांना क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं. या कामात सिंहाचा वाटा असणार्‍या डॉग्जची काळजी घेणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. त्यांच्यासाठी आणलेले कुलिंग जॅकेटस हा त्याचाच एक भाग आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2009 04:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2009 04:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close