S M L

मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही - शरद पवार

4 एप्रिल, मुंबई आपल्याला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही, असं उत्तर शरद पवार यांनी काल शुक्रवारी मुंबईत दिलं. काल शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहिरनामा वाचला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांना तिस-या आघाडीच्या सभेविषयी विचारलं होतं. तेव्हा पवारांनी तसं उत्तर दिलं. त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेसच्या दाबावामुळे आपण भुवनेश्वरला गेलो नसल्याचा आरोपाचा इन्कार केला. शरद पवार येत्या 7 किंवा 8 एप्रिलला नवीन पटनाईकांच्या बीजेडीबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यात डाव्या पक्षांचे नेते उपस्थित नसणार आहेत. तिस-या आघाडीच्या भुवनेश्वरमध्ये होणा-या सभेत शरद पवार त्यांनी फोनवरून काल भुवनेश्वरमध्ये मतदारांशी संवाद साधला. पवारांऐवजी राष्ट्रवादीचे प्रवक्ते डीपी त्रिपाठी तिसर्‍या आघाडीच्या सभेला उपस्थित राहिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2009 07:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2009 07:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close