S M L

निर्माते आणि मल्टिप्लेक्सच्या मालकांचा संप : आजपासून 'नो सिनेमा'

4 एप्रिल निर्माते आणि मल्टिप्लेक्सचे मालक यांच्यातल्या वाटाघाटीमधून काहीच तोडगा निघाला नसल्याने युनायटेड प्रोड्युसर्स डिस्ट्रिब्युटर्सचे अध्यक्ष मुकेश भट्ट यांनी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मल्टिप्लेक्सेसमध्ये एकही नवा हिंदी सिनेमा रिलीज होणार नाही. परिणामी अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज होण्याच्या तयारीत असतानाही दणदणीत रखडणार आहेत. निर्मात्यांच्या मागणीनुसार तिकीटविक्रीतून प्रत्येकाला समान नफा मिळायला हवा. तर हा नफा सिनेमा किती चालतो यावर अवलंबून असल्याचे मल्टिप्लेक्सच्या मालकांचे म्हणणे आहे. या संपामुळे निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स यांचं तब्बल 100 ते 200 कोटींचं नुकसान होणार असल्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2009 07:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2009 07:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close