S M L

वेलिंग्टन टेस्टमध्ये भारताचं पारडं जड : 233 धावांची आघाडी

4 एप्रिल, वेलिंग्टन वेलिंग्टन टेस्टमध्ये भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये 182 रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. दुसर्‍या इनिंगमध्येही भारतीय बॅट्समननी चांगली सुरुवात केली. वीरेन्द्र सेहवाग पुन्हा एकदा खराब शॉट खेळत झटपट आऊट झाला. पण द्रविड आणि गंभीर यांनी उरलेला वेळ सावधपणे खेळून काढला. आजचा खेळ थांबला तेव्हा दुसर्‍या इनिंगमध्ये भारताने एक विकेट गमावून 51 रन्स केले होते. टीमकडे आता 233 रन्सची आघाडी आहे. आजच्या दिवसाचा हिरो ठरला तो झहीर खान. न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला जोरदार हादरे देत त्याने पाच विकेट्स घेतल्या. इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची ही त्याची पाचवी खेप होती. सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या विकेट्स ठरावीक अंतराने जात राहिल्या. झहीर खेरिज हरभजन सिंगने तीन विकेट घेतल्या. न्यूझीलंडतर्फे रॉस टेलरने सर्वाधिक 42 रन्स केलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2009 08:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2009 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close