S M L

छत्रपती शिवाजी टर्मिनसला लवकरच मिळणार नवा चेहरा

4 एप्रिल, मुंबई रोहिणी गोसावी छत्रपती शिवाजी टर्मिनस ही 'मुंबई'ची शान. मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या या वास्तूचे काही भाग काळ सरल्यामुळे पडिक झाले आहेत. त्यामुळे या इमारतीचा काही भाग पडायला सुरुवात झाली आहे. स्टेशनच्या सौंदर्यात काही कमतरता जाणवू नये हा रेल्वे अधिकार्‍यांसमोर एक मोठा प्रश्न आहे.यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या रिस्टोरेशनची मोहिम सुरु केली आहे. ' वर्ल्ड हेरिटेज साइट्स'च्या यादीत मान मिळालेलं छत्रपती शिवाजी टर्मिनस खरं तर 150 वर्षांपूर्वीचं आहे. या ऐतिहासिक वास्तूचं बांधकाम ब्रिटिशकालीन 1878 मध्ये पू्र्‌ण झालं. त्याकाळी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या नावाखाली 'व्हिक्टोरिया टर्मिनस' असं नाव देण्यात आलं होतं. पण आता हे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असं बदलण्यात आलं. कंस्ट्रक्शनची स्टाइल गॉथिक आहे. पण या सुंदर बांधकामाचे काही भग्नावशेषही आहेत. त्यासाठीच हे रिस्टोरेशनचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिस्टोरेशनचे काम करण्यासाठी कारागीर खास राजस्थानहून आणले आहेत. इमारतीत मालाड-स्टोनचा वापर केला होता जो मुंबईमध्ये सहज मिळतो.पण त्याच्या शिल्पांचा दगड अतिशय दुर्मिळ आहे. या दगडांचा अभ्यास केल्यानंतर पोरबंदरमधून हा दगड मागवण्यात आलाय. या वास्तूची भव्यदिव्यता लक्षात घेता हे रिस्टोरेशन अधिकार्‍यांना महागातच पडणार आहे. ही बिल्डींग बांधताना तिच्यात जवळपास सात प्रकारचे दगड वापरण्यात आलेत. त्यावेळेला ही बिल्डिंग सोळा लाख रुपयांत तयार करण्यात आली होती. आणि आता तिच्या संवर्धनाला कोट्यावधी रुपये खर्च येणार आहे. या महाग रिस्टोरेशनचे संपूर्ण बिल रेल्वे बोर्डाच्या नावावर कापलं जाणार आहे. पहिल्याच टप्प्याचा खर्च जवळपास सात कोटी आहे. डिसेंबर 2009 पर्यंत संवर्धनाचा पहिला टप्पा पूर्ण होईल अशी खात्री रेल्वेला वाटतेय. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मूळ हेरिटेज इमेजला धक्का न लागू देता या वास्तूला रिस्टोर करण्याचं आव्हान रेल्वे अधिकार्‍यांवर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2009 11:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2009 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close