S M L

नगरमध्ये व्यापार्‍याची गोळ्या झाडून हत्या

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2014 04:40 PM IST

नगरमध्ये व्यापार्‍याची गोळ्या झाडून हत्या

ahamad_nagar_golibar28 एप्रिल : अहमदनगरमध्ये गंजबाजारात रविवारी रात्री एका व्यापार्‍याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडालीय. मोहन ट्रक डेपोचे मालक जितेंद्र भाटिया यांचा भर बाजारपेठेत एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केला. ही हत्या 30 लाखांच्या खंडणीसाठी करण्यात आल्याचा संशय आहे.

26 एप्रिलला जितेंद्र भाटिया यांना 30 लाखांच्या खंडणीसाठी धमकीचा एसएमएस आणि फोन आला होता. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवाचं बरं-वाईट करण्याची धमकीही दिली होती. त्याचीच तक्रार देण्यासाठी त्यांचा मुलगा काल रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गेला होता. हीच संधी साधून रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारात अज्ञातांनी दुकानातच जितेंद्र भाटियांवर गोळीबार केला, त्यात जितेंद्र यांचा जागीच मृत्यू झालाय.

दरम्यान, भर बाजारात झालेल्या हत्येनं गंजबाजारात भीतीचं वातावरण आहे. याचा निषेध म्हणून व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला .तर आज अहमदनगरमधील मार्केट बंदची हाक देण्यात आली. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली त्यांना निलंबित करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस सुरक्षा आणि सुव्यवस्था ढिसाळ झाली असून जिल्ह्यात गावठी शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर आहे.त्यामुळे नगर शहरा ए.टी.एस च्या ताब्यात देण्याची मागणी विधान सभेत करणार असल्याचे आमदार अनिल राठोड यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close