S M L

युरोपमध्ये हापूसवर बंदी

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2014 07:43 PM IST

युरोपमध्ये हापूसवर बंदी

ge_europ_hapus_3428 एप्रिल : आंबाचा राजा हापूस आता मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झालाय पण यंदा हापूसची युरोपवारी चुकली आहे. कारण चेन्नईवरून निर्यात झालेला आंबा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आढळला नसल्याने युरोपीयन युनियननं भारतीय आंब्यावर बंदी घातली आहेत. त्यामुळे हापूससह सर्वच आंब्यांची युरोपची निर्यात बंद होणार आहे.

1 तारखेपासून ही बंदी लागू होणार आहे. हापूस उत्पादकांना या बंदीचा मोठा फटका बसला आहे. युरोपात बंदी असली तरी दुबई आणि इतर अरब देशांमध्ये अशी बंदी नाही त्यामुळे तिथंआंब्याची निर्यात वाढली असून संयुक्त अरब अमिरातीमध्ये आंब्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आंबा व्यापार्‍यांना फटका बसतोय.

तर दुसरीकडे मुंबई आणि नवी मुंबईत मात्र आंबा स्वस्त झालाय. नवी मुंबई त हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झालीय. आज (सोमवारी) सकाळी ए.पी.एम.सी मार्केटमध्ये तब्बल दीड ते दोन लाख हापुसच्या पेट्यांची आवक झालीय. हापूस आंब्याची प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने आंब्याचे भाव उतरले आहेत. आता 150 ते 400 रुपये डझन या भावानं हापूस आंब्याची विक्री होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2014 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close