S M L

कल्याण डोंबिवली पालिकेचे स्थायीपद युतीकडे, मनसेचा पराभव

Samruddha Bhambure | Updated On: Apr 29, 2014 03:50 PM IST

कल्याण डोंबिवली पालिकेचे स्थायीपद युतीकडे, मनसेचा पराभव

29 एप्रिल : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आज पाडली यात भाजपच्या नगरसेविकेला फोडूनही मनसेच्या पदरी पराभव आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने सहज विजय मिळवला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीचा विजय झालाय. युतीचे दीपेश म्हात्रे स्थायी समितीचे सभापती म्हणून विजयी झालेत. म्हात्रेंना 7 मतं मिळाली, तर मनसेच्या उमेदवाराला 4 मतं मिळाली. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे आज त्या मनसेच्या नगरसेवकाबरोबरच सभागृहात आल्या. त्यांच्यासोबत मनसेचे आमदार रमेश पाटील स्वत: होते. कोठावदे यांना पक्षाचा व्हिप देण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आले होते.

मात्र मनसेच्या सदस्यांनी कोठावदे यांना व्हिप घेऊ न देता सभागृहात नेलं यावेळी महायुतीच्या महिला नगरसेविकांनी अर्चना कोठावदेंना धक्काबूक्कीही झाली.या गडबडीत पक्षाचा व्हिपही फाटलाकेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.पण, नगरसेविका फोडूनही मनसेच्या पदरी पराभवच आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close