S M L

गुंडांची मुजोरी, पत्रकाराला मारहाण कॅमेर्‍यात कैद

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2014 08:38 PM IST

गुंडांची मुजोरी, पत्रकाराला मारहाण कॅमेर्‍यात कैद

3453sanjay_prasad_reporter29 एप्रिल : पत्रकारांना मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत पण गुंडांच्या मुजोरीचं चित्र कॅमेर्‍यात कैद झालंय. मुंबईमध्ये टीव्ही जर्नलिस्ट संजय प्रसाद हे आपल्या पत्नी सोबत बाजारात खरेदी करत असताना काही गुंडांनी त्यांच्या पत्नीची छेड काढली. गुंडांनी त्यांच्या पत्नीवर शेरेबाजी केली. संजय यांनी याचा जाब विचारला असता पाच गुंडांनी त्यांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात रेकॉर्ड झालाय.

गेल्या आठवड्यात मुंबईतील मालाड इथं साईनाथ मार्केटमध्येही घटना घडली होती. या प्रकरणी सहाही जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी माझ्या पत्नीसोबत मार्केटमध्ये खरेदी करत होतो तेव्हा एका तरुणाने शेरेबाजी केली.

त्याची समजूत काढली पण त्यानंतर तो त्याच्या काही साथीदारांसह तिथे आला आणि हल्ला केला. पण एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये हा प्रकार घडला यावेळी तिथे खूप लोक होती पण समोर कुणीही आलं नाही. जे हॉकर्स होते त्यांच्याच ओळखतली ही लोक असावी त्यामुळे ज्यावेळी हा प्रकार घडत होता त्या हॉकर्सचा यांना मुक पाठिंबा होता असंच दिसून आलं असं संजय प्रसाद यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2014 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close