S M L

नाशिकमध्ये रस्त्यासाठी 3 हजार झाडांची होणार कत्तल

Sachin Salve | Updated On: May 1, 2014 08:35 PM IST

नाशिकमध्ये रस्त्यासाठी 3 हजार झाडांची होणार कत्तल

tree_cuting_india01 मे : नाशिक शहरात रस्ते बांधण्यासाठी तब्बल 3 हजार 500 झाडं तोडण्यात येत आहेत. याविरोधात हरित लवादाने नाशिक महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे, शहरातल्या झाडांचं संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष समितीच्या सदस्यांची नावंही परस्पर काढण्यात आली आहे. उरलेल्या नगरसेवकांना हाताशी धरून तब्बल साडेतीन हजार झाडं तोडण्याच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

वृक्ष समितीच्या सदस्यांनी आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात वारंवार आवाज उठवला, थेट कोर्टात धाव घेतली, तरी महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2014 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close