S M L

नागपूरमध्ये गेल्या 48 तासांत 5 जणांचा खून

Sachin Salve | Updated On: May 1, 2014 07:50 PM IST

crime scene01 मे : नागपूरमध्ये गेल्या 48 तासात पाच जणांचा खून झाली असल्याचं समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गणेशपेठ येथे तरुणाची गुंडांनी भररस्त्यात खून केल्यानंतर आरोपी भरार आहेत.

तर इमामवाडा येथे एका डान्सर तरुणी पुजाचा खून करून आरोपी फरार झाला आहे. तर सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहिरीत महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की हत्या यासंदर्भात पोलीस तपास करत आहे.

तर पाचवा खून हा एमआयडीसी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केला आहे.निरपराध लोकांचे बळी जात असतांनाच पोलीस मात्र शात आहेत. यासंपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2014 07:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close