S M L

गडकरींच्या पूर्तीची 7 लाखांची बँक गॅरंटी जप्त करा !

Sachin Salve | Updated On: May 2, 2014 09:48 PM IST

574hbdgadkari 34602 मे : नागपूरच्या बेला येथील वेणा नदी प्रदुषित होत असल्याने भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेडची 7 लाखांची बँक गॅरंटी जप्त करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.

पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेडने आणखी 14 लाख रुपये भरण्याचेही आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला येथील पूर्तीच्या साखर कारखान्यातून निघणारे प्रदुषित पाणी प्रक्रिया न करताच वेणा नदीवरील वडगाव धरणातील पाण्याच्या साठ्यात सोडण्यात येत असल्याचा ठपका पूर्तीवर ठेवण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीने या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. पुर्तीने प्रदुषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारावा अन्यथा आणखी कडक कारवाई केली जाईल असंही मंडळाने सांगितलं. वेणा नदी आणि नदीवरील वडगाव धरणातील पाण्याचे नमूने प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले होते. या नमुन्यात या पाण्यात प्राणी, वनस्पती आणि मनुष्यजीवनास नुकसान होणारे घटक पाण्यात असल्याच निष्कर्ष काढण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2014 09:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close