S M L

नितीन आगे हत्याकांड प्रकरणाचा खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात

Sachin Salve | Updated On: May 2, 2014 10:33 PM IST

नितीन आगे हत्याकांड प्रकरणाचा खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात

nitin_aage02 मे : अहमदनगर जिल्ह्यात नितीन आगे हत्याकांड प्रकरणाचा खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिले आहेत. नगर जिल्ह्यात जामखेडमधल्या नितीन आगेची प्रेमप्रकरणाच्या संशयातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवल्यानंतर गृहमंत्र्यांनी खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात चालेल असे आदेश दिले आहे.

 दरम्यान, कोसळलेली कायदा-सुव्यवस्था- बधीर झालेली राजकीय संवेदनशीलता आणि समाजाचा न राहीलेला धाक या कारणांमुळं खर्डा गावात ही घटना घडलीये, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलंय.

जामखेडचे आमदार आणि अहमदनगरचे खासदार काय करत आहेत असा सवाल सप्तर्षी यांनी केलाय. राजकीय दृष्ट्या सतर्क असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील -गडाख- थोरात या बड्या राजकारण्यांचा धाक- दरारा उरला नाही का अशी जळजळीत टीकाही सप्तर्षी यांनी केलीय. राज्यातल्या निवडणुका आता संपल्या आहे. आता तरी लक्ष द्या असं आवाहन कुमार सप्तर्षी यांनी राजकीय नेत्यांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2014 10:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close