S M L

रायगडमध्ये काँग्रेस पक्षातच फूट : शिवसेना विरुद्ध काँग्रेस की, काँग्रेस विरुद्ध कांग्रेस ?

6 एप्रिल, रायगडश्वेता पवाररायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अंतुले यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आहे. यावरून त्यांच्या उमेदवारीवर नाराज झालेले काँग्रेसचे आमदार मधू ठाकूर आणि त्यांचा मुलगा प्रविण ठाकूर यांनी पक्षाविरुद्ध बंड केल्यामुळे आता काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय. गेल्या साठ वर्षांपासून राजकारणात असलेले ए. आर. अंतुले काँग्रेसचे रायगडमधले लोकसभेचे खासदार असून काँग्रेसकडून त्यांनी यावेळी पुन्हा आपला उमेदवारी अर्ज भरला. पण कार्यकर्त्यांनी फसवल्यामुळे अंतुले नाराज आहेत. तरुणांना संधी द्या असा नारा देणार्‍या काँग्रेसने रायगडकडे मात्र दुर्लक्ष केलं आणि उमेदवारी नाकारलेल्या प्रविण ठाकूर यांनी पक्षाविरोधात बंड केलं असून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत काँग्रेसची ताकद कमी पडतेय असं मत राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या काँग्रेसबाबत रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी व्यक्त केलं. रायगडमध्ये काँग्रेस पक्षातच फूट पडलीय. त्यामुळे आता ही निवडणूक शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होणार की, काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हे राजकीय कोडं उलघडणं मजेशीर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 10:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close