S M L

भाईंदरजवळ बिल्डिंग कोसळली : बिल्डिंग पाडतानाच घडली दुर्घटना

6 एप्रिलमुंबईत एखादी जुनाट बिल्डिंग पडण्याची बातमी आपण बरेचदा ऐकतो. आज पुन्हा एकदा मुंबईच्या भाईंदर परिसरात एक बिल्डिंग कोसळली. भाईंदरमध्ये इंद्रलोक परिसरात एक बिल्डिंग पाडत असतानाच बिल्डिंग कोसळून ही दुर्घटना घडलीय. सकाळी सहा वाजल्यापासून बिल्डिंग पाडण्याचं काम सुरु होतं तेव्हाच अचानक ही दुर्घटना घडली. ही चार मजली बिल्डिंग अनधिकृत असून बिल्डिंगचं कंस्ट्रकशन एका गटारावर करण्यात आल्यामुळे ही बिल्डिंग अनधिकृत व धोकादायक ठरवण्यात आली होती. बिल्डिंगच्या ढिगार्‍याखाली जेसीबी मशिन्सचे ड्रायव्हर, तसेच तिथ काम करणारे मजूर अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाईंदर परिसरात अशा अनेक अनधिकृत बिल्डिंग असून या दुर्घटनेवरून अशा बिल्डिंग्सवर लक्ष ठेवण्यात यावं ही मागणी करण्यात येत आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 12:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close