S M L

राहुल बनगया ऑलराऊंडर : टेस्टध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड ब्रेक

6 एप्रिलटेस्ट क्रिकेटमधला तंत्रशुध्द बॅट्समन आणि सर्वात सुरक्षित स्लिप फिल्डर म्हणून द वॉल राहुल द्रविडची ख्याती आहेच. त्यात आता एका नवीन विक्रमाची भर पडली आहे. टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड द्रविडनं आपल्या नावावर करत ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉला मागे टाकलं आहे. झहीर खानच्या बॉलिंगवर मॅकेनटॉशचा उडालेला हा कॅच स्लिपमध्ये राहुल द्रविडनं पकडला आणि द्रविडच्या नावावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड जमा झाला आहे. द्रविडच्या नावावर आतापर्यंत 133 टेस्ट मॅचमध्ये 183 कॅचची नोंद झालीय. टेस्टमध्ये आतापर्यंत फक्त सहा प्लेअर्सच्या नावावर 150हून अधिक कॅचची नोंद आहे. यात स्टिफन फ्लेमिंग, ब्रायन लारा, मार्क टेलर आणि ऍलन बॉर्डरचा समावेश असून विशेष म्हणजे यातला एकही क्रिकेटपटू सध्या खेळत नाही. याचाच अर्थ द्रविडचा हा रेकॉर्ड येणार्‍या काही काळात तरी अबाधित राहणार हे नक्की आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 12:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close