S M L

सुप्रीम कोर्टाने फेटाळली कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची याचिका

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2014 05:36 PM IST

campa cola campound05 मे : सुप्रीम कोर्टाने कॅम्पाकोलाच्या रहिवाश्यांना झटका दिला असून 31 मे पर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेशावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात आणखी मुदतवाढ दिली जावी, अशी याचिका इथल्या नागरीकांनी केली होती. ती आज सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

आता 31 मेनंतर या इमारतीवर कारवाई करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे शेकडो रहिवाशांवर बेघर होण्याची नामूष्की ओढावणार आहे.

मुंबईतील वरळी येथे कॅम्पा कोला ही इमारत असून या इमारतीतील काही मजले बेकायदेशीररित्या बांधण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी या अनधिकृत मजल्यांवर महापालिकेतर्फे हातोडा मारण्यात येणार होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने बांधकाम पाडण्यास 31 मेपर्यँत स्थगिती दिली होती.

या प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. रहिवाशांनी घर खाली करण्यास 31 मेनंतर मूदतवाढ द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ देण्यास नकार देत कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यावर पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2014 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close