S M L

ललित 'मोदी' जिंकले पण आरसीए 'सरकार'च बरखास्त !

Sachin Salve | Updated On: May 6, 2014 03:56 PM IST

ललित 'मोदी' जिंकले पण आरसीए 'सरकार'च बरखास्त !

56lalit_modi06 मे : ललित मोदी यांनी आज पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा प्रयत्न केला आणि मोदी जिंकलेही पण त्यांच्या विजयाची किंमत राजस्थान क्रिकेट असोसिएशनला मोजावी लागली. आरसीएच्या निवडणुकीत आज (मंगळवारी) सकाळी ललित मोदींची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पण या निकालानंतर बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर कारवाईचा बडगा उगारला. बीसीसीआयने आपल्या सदस्य मंडळातून आरसीएला निलंबित केलं आहे. आता राजस्थान क्रिकेटचा कारभार चालवण्यासाठी बीसीसीआय एका समितीची स्थापना करणार आहे. तर याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं आरसीएनं स्पष्ट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आज सकाळी आरसीएने ललित मोदींची अध्यक्षपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांचा बीसीसीआयमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला यानंतरची कारवाई करण्याचे अधिकारही दिले होते. त्याप्रमाणे बोर्डाने आरसीएवर निलंबनाची कारवाई केली आहे. आयपीएल घोटाळ्याप्रकरणी बोर्डाने याअगोदरचे ललित मोदींवर आजीवन बंदी घातली होती. पण घटनेचा आधार घेत मोदींनी निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा पण पुन्हा एकदा बीसीसीआयने ललित मोदींना शह दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close