S M L

सलमानकडून 5 लाख घेऊन तोंड बंद ठेवण्याची धमकी -साक्षीदार

Sachin Salve | Updated On: May 7, 2014 07:30 AM IST

सलमानकडून 5 लाख घेऊन तोंड बंद ठेवण्याची धमकी -साक्षीदार

64577hit-and-run-salman34606 मे : हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता चांगलाच गोत्यात सापडला आहे. आज ओळख परेडमध्ये तिन्ही साक्षीदाराने सलमानला ओळखलं आहे. साक्षीदारांनी नुसतं ओळखलं नाही तर सलमान आपल्याला धमकी देतोय असा आरोप साक्षीदारांनी केलाय. मुस्लीम शेख या साक्षीदाराने सलमानकडून 5 लाख घेऊन तोंड बंद करण्याची धमकी दिली असा दावा केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय.

दबंग खान अर्थात सलमान खानने 2002 साली बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या निष्पाप लोकांना चिरडलं होतं. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते. तब्बल 12 वर्षांनंतर हिट अँड रन प्रकरणाची कोर्टात आज (मंगळवारी) महत्त्वाची सुनावणी झाली.

 

आज झालेल्या सुनावणीला सलमान खान दिवसभर कोर्टात हजर होता. शांतपणे वकिलांच्या प्रश्नाची उत्तर सलमानने दिली. सरकारी वकिलांनी साक्षीदारांची साक्षही नोंदवून घेतली. यावेळी ओळख परेड घेण्यात आली. प्रत्यक्षदर्शी तिन्ही साक्षिदारांनी सलमानला ओळखलं. ज्या दिवशी हा अपघात घडला. सलमान गाडीमध्येच होता. सलमानची गाडी आमच्या अंगावरुन गेली, सलमानने तुमच्या अंगावरुन गाडी घातली, असं तिथे असलेल्या लोकांनी आपल्याला सांगितलं अशी साक्ष या अपघातात जखमी झालेला मुस्लीम मियाँ शेख यांनी दिली.

 

अपघातानंतर गर्दी जमल्याचं पाहून सलमान पळून गेल्याचंही साक्षीदारांनी सांगितलंय. तर, मुस्लीम शेख या साक्षीदारानं आपल्याला दोन दिवसांपूर्वी सलमानकडून धमकी आल्याचा दावा केलाय. 5 लाख घेऊन तोंड बंद करण्याची धमकी आल्याचं त्यानं म्हटलंय. हिट अँड रन केसची आजची सुनावणी संपली. आता पुढची सुनावणी 19 मे रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीमुळे सलमान खान आता चांगलाच गोत्यात आलाय. जर साक्षीदाराची साक्ष कोर्टात गृहीत धरली तर सलमानवर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होईल. या प्रकरणी सलमानला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

हिट अँड रन प्रकरणाचा घटनाक्रम

  • 28 सप्टेंबर 2002 - मुंबईत सलमानच्या गाडीखाली चिरडून  1 मृत्यू,3 जखम
  • - सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  • - महानगर दंडाधिकारी न्यायालयात प्रकरणाची सुनावणी रेंगाळली
  •  2013 - खटला मुंबई सेशन्स कोर्टाकडे
  • - खटला नव्याने सुरू करण्याची सलमानच्या वकिलांची मागणी मान्य
  • - 28 एप्रिल 2014 पासून खटल्याची नव्याने सुनावणी
  • - पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवून खटल्याला सुरुवात
  • - 6 मे 2014 - सलमान खानची ओळख परेड
  • - प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमानला ओळखले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close