S M L

सोनई हत्याकांडातील पीडित अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Salve | Updated On: May 6, 2014 09:04 PM IST

Image img_230332_sonai_dalitmuder_240x180.jpg06 मे : गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातच घडलेल्या सोनईमधल्या तिहेरी हत्याकांडात पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाहीय. सवर्ण मुलीशी प्रेमप्रकरणातून मेहतर सामाजातल्या संदीप थनवर(24), सचिन धारू(26) आणि राहुल कंदारे (26) या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या शरीराचे तुकडे करुन पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता.

मात्र त्या घटनेतलं क्रौर्य बघता अद्यापही पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. दलित अत्याचारविरोधी कायद्यानुसार पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. सचिनच्या पत्नीला नोकरी मिळाली.

पण कोर्टात खटला पुढे सरकला नाही. अहमदनगर जिल्ह्याबाहेर हा खटला चालवावा, या पीडित कुटुंबाच्या अर्जावर दीड वर्षांनंतरही निर्णयही झालेला नाही. 30 एप्रिल 2013 ला याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालं. स्पेशल कोर्ट आणि फास्ट ट्रॅक तर दूरची गोष्ट. नियमितपणे ज्या गोष्टी व्हायला व्हाव्यात त्यासुद्धा होत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close