S M L

सावधान, 'त्या' आंब्यांमुळे कॅन्सर होऊ शकतो !

Sachin Salve | Updated On: May 6, 2014 09:35 PM IST

सावधान, 'त्या' आंब्यांमुळे कॅन्सर होऊ शकतो !

78eating_mango4506 मे : फळांचा राजा म्हणजे आंबा..त्यातच हापूसची परदेशी वारी हुकल्यामुळे आंबा आवाक्यात आलाय पण आंबा खाल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो अशी धक्कादायक शक्यता औषध प्रशासनाने व्यक्त केलीय.

कॅलशियम कार्बोनेटच्या साह्याने पिकवलेले आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहेत या आंब्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील दुकानांमधून तब्बल 2400 किलो आंबे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त करुन नष्ट केले आहेत.

आंबे पिकवण्यासाठी आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅलशियम कार्बोनेटच्या पिशव्या टाकण्यात आल्याचं या कारवाईत पुढे आलंय. असे आंबे जर जास्त प्रमाणात खाण्यात आलेत तर ब्लड कॅन्सर, आतड्याचे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लहान मुले आणि वृद्धांना अशा आंब्यापासून जास्त धोका असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. आंबे घेतांना ते अशा पद्धतीने पिकवली नसल्याचं नागरिकांनी खात्री करून घ्यावी आणि तरच आंबे विकत घ्यावेत असं आवाहनही डॉक्टरांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2014 09:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close