S M L

मुंबईकरांना दिलासा, यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात नाही!

Samruddha Bhambure | Updated On: May 8, 2014 03:12 PM IST

मुंबईकरांना दिलासा, यंदाच्या उन्हाळ्यात पाणीकपात नाही!

dam08 मे :  मुंबईकरांना दिलासा देणारी एक बातमी आहे. मुंबईमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तलांवामध्ये यंदा 40 टक्के ज्यादा पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणीकपात करावी लागणार नाही असं मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे.

'अल निनो' च्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पाण्याची टंचाई भासल्यास पालिकेची यावर काय तयारी आहे असा प्रश्न बुधवारी नगरसेवकांनी स्थायी समितीत केला होता. त्यावर पालिकेतर्फे तलांवामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलांवामध्ये सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या वैतरणा तलावात 99 दिवसांचा तर भातसामध्ये 77 दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच यंदा 80 टक्के पाऊस झाल्यास सर्व धरणे ओव्हरफ्लो होतील.

तलांवामध्ये पुरेसा पाणीसाठा

2013 : 2,69,223 एमएलडी

2014 : 3,65,671 एमएलडी

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या दोन महत्त्वाच्या तलावांमध्ये

वैतरणा तलाव - 99 दिवसांचा पाणीसाठा

भातसा तलाव - 77 दिवसांचा पाणीसाठा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2014 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close