S M L

'सुन रहा है ना तू' फेम गायक अंकित बलात्काराच्या गुन्हात अटकेत

Sachin Salve | Updated On: May 8, 2014 05:34 PM IST

'सुन रहा है ना तू' फेम गायक अंकित बलात्काराच्या गुन्हात अटकेत

4ankit_tiwari_arrest08 मे : 'सुन रहा है ना तू' या आशिकी -2 चित्रपटातील गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला पार्श्वगायक अंकित तिवारी अडचणीत सापडला आहे. अंकितला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

अंकित तिवारी आणि त्याचा भाऊ अंकुर तिवारी यांना आज (शुक्रवारी) मुंबईत वर्सोव्हा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. अंकितच्या प्रेयसीने हा बलात्काराचा आरोप केलाय. अंकितवर बलात्कार, फसवणूक आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकितचे वकिल नागेश मिश्रा यांनी या बातमीला दुजोरा दिला असून अंकितवरील आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. दोन वर्षांपूर्वी अंकित आणि पीडित तरुणीने एका मंदिरात लग्न केलं होतं त्यानंतर अंकितने शारिरीक संबंधही ठेवले. पण अंकितने लग्नाबाबत नकार दिला. मात्र अंकितने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. पण संबंधीत तरुणीशी आपले संबंध होते हे मात्र मान्य केलं.

मागील एका वर्षांपासून आम्ही संपर्कात नव्हतो असंही अंकित म्हणाला. अंकितचे वकिल नागेश यांनी दावा केलाय की, संबंधीत तरुणीने लावलेले आरोप खोटे असून ती अगोदरच विवाहित आहे आणि तिला दोन वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. या प्रकरणी आता अंकित आणि त्याचा भाऊ अंकुरला अंधेरीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2014 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close