S M L

आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स डर्बनला रवाना

7 एप्रिलइंडियन टीमने वेलिंग्टनचा ऐतिहासिक विजय ंमिळवल्यानंतर आता मुंबई इंडियन्स टीमही आयपीएलच्या दुसर्‍या हंगामासाठी सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्स टीम आयपीएलच्या दुसर्‍या हंगामासाठी डर्बनला रवाना झाली आहे. आयपीएलच्या दुसर्‍या हंगामाची तारीख जशी जवळ येतेय तशी सर्व टीम्सची जोरात तयारी सुरु झाली आहे. सर्व टीम्स हळूहळू दक्षिण आफ्रिकेत दाखल होत आहेत. मॅचेसाठी सर्व टीम्सचा सरावही जोरात सुरु झाला आहे. उद्यापासून डरबनमध्ये टीम आपला सराव करणार आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. टीममध्ये सनथ जयसूर्या, हरभजन सिंग आणि झहीर खान यांसारख्या स्टार खेळाडूंची नावं तर आहेतच . त्याबरोबरच धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यासारख्या होतकरू युवा क्रिकेटर्सचाही या टीममध्ये समावेश आहे. डर्बनमध्ये सराव केल्यामुळे टीमला खूप फायदाही होणार आहे. आयपीएलच्या सर्वात जास्त मॅचेस डर्बनमध्येच होणार आहेत. याशिवाय टीमचे कोच शॉन पोलॉक आणि फिल्डिंग कोच जाँटी र्‍होड्स दोघंही दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्याचा मोठा फायदा टीमला इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना होणार आहे. या सर्व जमेच्या गोष्टी मुंबई इंडियन्ससाठी पथ्यावरच पडणार असल्याचं दिसून येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 09:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close