S M L

लालूंवर बिहारमध्ये गुन्हा दाखल : वरुणवरच्या वक्तव्यामुळे लालू अडचणीत

7 एप्रिलवरुणबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लालूप्रसाद यादव अडचणीत आले आहेत. किशंनगंज जिल्हा प्रशासनानं लालू प्रसाद यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ' वरूणने मुसलमानांविरोधात केलेल्या वक्तव्यावर चिडून आपण गृहमंत्री असतो तर वरूण गांधीवर बुलडोझर चालवला असता', असं वक्तव्य एका प्रचार सभेदरम्यान लालूप्रसाद यादव यांनी केलं होतं. पण त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते अडचणीत आले आसून त्यांनी आता माघार घेतली आहे. त्यावेळी 'कायद्याचा बुलडोझर चालवण्यात यावा असं आपल्याला म्हणायचं होतं' हे सांगून लालू झाल्याप्रकाराचं समर्थनच करत आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर एकीकडे वरुण गांधींबाबत लालूप्रसाद यांनी केलेल्या वक्तव्यावर ' लालू काय म्हणाले ते मी ऐकलं नाही पण अशा वक्तव्यांमुळे समाजात अशांतता पसरते आणि अशा वक्तव्यांचा मी तीव्र निषेध करतो' अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 10:22 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close