S M L

कल्पना गिरी हत्येचा तपास सीआयडीकडे

Sachin Salve | Updated On: May 10, 2014 02:51 PM IST

kalpanagiri_latur4510 मे : लातूर येथील कल्पना गिरी हत्येचा तपास आता राज्य सीआयडीकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी मागणी केली आहे.

लातूरच्या युवा काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांची मार्चमध्ये हत्या झाली होती. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीच तिची हत्या केल्याचंही उघड झालं. या प्रकरणी लातूरमधल्या 2 काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. दोन्ही आरोपींपैकी एकाने कल्पनाच्या हत्येमागे आपला हात असल्याचं मान्य केलंय.

पण या अटकेनंतर या हत्येसंदर्भात पुढे कोणतीच कारवाई झाली नाही. राहुल गांधींनीही लातूरमध्ये येऊन कल्पना यांच्या पालकांची भेट घेतली नाही. त्यामुळे तिचे पालक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2014 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close