S M L

मल्टिप्लेक्सच्या संपामुळे आले शाहरूख आमिर एकत्र

7 एप्रिल शाहरूख खान आणि आमीर खान या दोघांमधील संबंध गेल्या काही दिवसांपूर्वी बिघडले होते. त्यादोघांमध्येबिघडलेल्या संबंधांची भरपूर चर्चा झाली.पण सध्या चाललेल्या मल्टिप्लेक्सच्या संपाने आमीर आणि शाहरूख यांना निर्माते म्हणून एकाच मंचावर आणलं. निमित्त होतं निर्मात्यांनी घेतलेली पत्रकार परिषद. निर्माते आणि मल्टिप्लेक्सच्या मालकांमध्ये रेव्हेन्यू शेअरच्या वाटणीवरुन वाद झाला होता. मल्टिप्लेक्सचे मालक नाराजी व्यक्त करण्यासाठी संपावर गेले होते. तिकीट विक्रीतून होणारा फायदा हा 50 - 50 टक्के हवा असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. आमीर खान, शाहरूख खाननेही त्याला आज दुजोरा दिला. सध्या या संपामुळे कुठलाही मोठा सिनेमा रिलीज होत नाही. प्रेक्षकांच्या करमणुकीची ही गैरसोय थोडा काळच राहील, असं शाहरूख खान म्हणाला. निर्मात्यांच्याच वर्मावर घाव घातल्यामुळे एरवी फिल्मस्टार बनून पत्रकारांसमोर येणारे शाहरुख आणि आमिर खान आज पहिल्यांदा निर्माते म्हणून एकत्र मीडियासमोर आले. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये फिल्म इंडस्ट्रितले नेहमीपेक्षा जास्त मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 03:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close