S M L

गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात 7 जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2014 06:08 PM IST

Image img_101462_naxal_240x180.jpg11 मे : राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी नक्षली हल्ल्यामध्ये 7 जवान शहीद झाले आहेत. भूसुरुंग स्फोटात टाटा सुमो गाडी उडवून नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.

गडचिरोली जिल्ह्यातील चामुर्शी तालुक्यातील मुरमुरीजवळ माओवाद्यांनी भुसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची सुमो गाडी उडविली. सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी हा हल्ला झाला. हे सर्व जवान सी-सिक्स्टी तुकडीचे आणि नक्षलविरोधी पथकातले कमांडो आहेत असं पोलीस महासंचालकांनी सांगितलं.

घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या हल्य्यात दोण जवान जखमी झालेत. त्यांना हेलिकॉप्टरनं नागपूरला नेण्यात आलंय, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.

शहिद झालेल्या जवानांची नावे

  • कॉन्स्टेबल -सुनील मडावी -चंद्रापुर
  • कॉन्स्टेबल-रोहन डबांडे-चार्मोर्शी
  • कॉन्स्टेबल-सुभाष कुमरे-जारावंडी
  • कॉन्स्टेबल-दुर्योदण नागतोडे,वडसा-कुरुड
  • कॉन्स्टेबल -तिरुपति अल्लम-चिट्टूर अंकिसा
  • नायक पोलिस शिपाई-दिपक विदावे-गडचिरोली
  • पोलिस ड्रायव्हर-लक्ष्मण मुंडे-अंतरवेली,जिल्हा-परभणी.

गंभीर जखमी

  • पंकज सिडाम-जारवंडी
  • हेमंत बंसोड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2014 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close