S M L

200 रुपयाच्या बिलासाठी चौघांवर ऍसिड हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2014 03:29 PM IST

acid-attack11 मे :  सांगलीतल्या कसबा डिग्रज इथल्या गुरुप्रसाद ढाब्यावर जेवणाचे 200 रुपये बील मागितले म्हणून अंगावर ऍसिड फेकण्याची घटना घडली आहे. यामध्ये चारजण जखमी झालेत. जखमींमध्ये हॉटेल मालक बाजीराव परिट, त्यांची आई अब्बुबाई परिट आणि त्यांच्या मुलांचा संदीप परिट आणि प्रदीप परिट यांचा समावेश आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी बबन हजारे आणि अरुण हजारे या दोघांना अटक केली आहे.

आरोपी अरुण हजारेही यामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर हॉटेल मालक बाजीराव परिट हे 50 टक्के भाजलेत त्याची प्रकृती गंभीर आहे. संदीप 28 टक्के आणि प्रदीप 45 टकके भाजलेत. तर अब्बूबाई यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. बबनने जेवणाचे बिल दयायला नकार दिल्याच्या मुद्दयावरुन हा सगळा प्रकार घडला.

आरोपी बबन बॅटरी रिपेरिंगचं काम करतोआणि त्यानी या कामासाठी वापरल्या जाणार्‍या ऍसिडचा यावेळी वापर केला. या आरोपींवर खुनाचा प्रयत्न करणे, हल्ला करणे, गंभीर दुखापत करणे, संगनमताने गुन्हा करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2014 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close