S M L

सगळ्यात जास्त मायलेज देणारी स्मॉल कार बनवणार : बजाज ऑटो कंपनीचा दावा

7 एप्रिल, दिल्लीस्वाती खंडेलवालजगातली सगळ्यात स्वस्त कार बनवल्यानंतर आता भारतीय ऑटो इंडस्ट्री सगळ्यात जास्त मायलेज देणारी कार बनवण्याच्या तयारीत आहे. बजाज ऑटोने स्मॉल कार एका लिटरला 30 किलोमीटर एवढं सगळ्यात जास्त मायलेज देणारी स्मॉल कार बनवणारअसल्याचा दावा केलाय. हायब्रिड कारनंतर आता आपण स्मॉल कार प्रोजेक्टवर काम करत असल्याचं टू व्हीलर कंपनी बजाजने जाहीर केलंय.आपली ही कार सगळ्यात जास्त मायलेज देत असून फ्युएल एफिशियन्सी आणि एमिशन नॉर्म्सबाबत आपल्याला यश मिळाल्याचं बजाज ऑटो कंपनीेचे एमडी राजीव बजाज यांचं म्हणणं आहे. आम्ही फक्त स्वस्त कार बनवण्याच्या शर्यतीत नसून आम्हाला 30 किलोमीटर मायलेज देणारी अशी सगळ्यात फ्युएल एफिशियंट कार बनवायचीय. या कारचं उत्पादन 2011 पर्यंत सुरु होणार असल्याचं बजाज यांचं म्हणणं आहे. हा अल्ट्रा लो कॉस्ट प्रोजेक्ट बजाज, रेनॉ आणि निस्सान कंपन्या करणार होत्या. पण आता या दोन कंपन्यांची साथ मिळाली नाही तरीही आपण स्वबळावर हा प्रोजेक्ट पूर्ण करणार असल्याचं बजाज यांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2009 03:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close