S M L

शिवसेनेच्या मोहन रावले यांची संपत्ती जाहीर

8 एप्रिल दक्षिण मुंबईतले शिवसेनेचे उमेदवार मोहन रावले यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी आपली संपत्तीही जाहीर केली. 2004 साली मोहन रावले यांच्याकडे जवळपास पन्नास लाख रुपयांची संपत्ती होती. आता या संपत्तीत दुपटीहूनही जास्त वाढ झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रावले यांनी आज 1 कोटी 16 लाख 76 हजार रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. रावले यांच्याकडे एक ऍम्बॅसिडर कार आहे. सव्वालाख रुपयांचे सोन्याचे दागिने तर साडेबारा हजार रुपयांचे चांदीचे दागिने त्यांच्या मालकीचे आहेत. शेअर्स, बाँड्स यामध्ये मोहन रावले यांची गुंतवणूक आहे आठ लाख सत्तावन्न हजार रुपयांची. तर रावले यांच्या पत्नी इंदिरा रावले यांची गुंतवणूक आहे अठरा लाख आठ हजार रुपयांची. इंदिरा रावले यांच्याकडे चार लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 8, 2009 01:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 8, 2009 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close